सरकारी वाहनांच्या तुलनेत खासगी वाहनांच्या तिकीट दर अधिक असतो. त्यामुळे सर्वसामान्य जनता हे एसटी महामंडळाची बस किंवा रेल्वे यावर अवलंबून असतात. रेल्वेचे दर कमी असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी हे सर्वाधिक रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेननी प्रवास करण्यास प्राधान्य देतात. अशातच सोलापूर विभागातून धावणाऱ्या चार पॅसेंजर ट्रेन्सना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे त्या पॅसेंजर गाड्यांचा प्रवास आता वेगवान होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे.
प्रवाशांकडून होतेय ही मागणी
मात्र या चार पॅसेंजर ट्रेन्सना एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला असला तरी प्रवाशांकडून या पॅसेंजर ट्रेनचे थांबे पूर्ववत ठेवण्याची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून शहरातील आणि ग्रामीण भागातील कित्येक प्रवासी पुण्याच्या दिशेने शिक्षण तसेच नोकरीसाठी जातात. यातील अनेक प्रवाशांना एक्स्प्रेसचे तिकीट परवडत नसल्याने ते एक्सप्रेस गाड्यांनी न जाता पॅसेंजर ट्रेनने प्रवास करतात.
कोणत्या पॅसेंजर गाड्यांना मिळणार एक्स्प्रेचा दर्जा
- सोलापूर पुणे डेमू
- पुणे-सोलापूर डेमू
- सोलापूर-वाडी
- वाडी-सोलापूर
(हेही वाचा – मुंबई विभागातील ‘ही’ प्रमुख स्थानकं होणार चकाचक!)
मात्र अशा प्रवाशांना सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर डेमूचा फायदा होत नाही. सोलापूर-वाडी, वाडी-सोलापूर या गाड्या सर्व स्थानकावर थांबत होत्या. मात्र, आता एक्स्प्रेसचा दर्जा दिल्याने कमी उत्पन्नाच्या स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एकीकडे गाड्या एक्स्प्रेस झाल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होतांना दिसतेय. त्यामुळे प्रवाशांनी पूर्वीचे थांबे तसेच ठेवावेत, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.