शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के जाहीर झाली असून, राज्यभरातील ९ हजार ६८६ शाळांमध्ये असलेल्या १ लाख १ हजार ९०९ जागांपैकी पहिल्या सोडतीत ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यातील ३८ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपली प्रवेशनिश्चिती केली आहे.
२९ एप्रिलपर्यंत प्रवेशनिश्चिती करता येणार
मुंबईतही ५ हजार ३४२ जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत २ हजार २५८ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली असून, २९ एप्रिलपर्यंत पालकांना प्रवेशनिश्चिती करता येणार आहे. student.maharashtra.gov.in या वेबसाईयवर यंदाची आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी जाहीर झाली आहे. ५ एप्रिलपासून त्याच्या प्रवेश प्रक्रियेची देखील सुरूवात झाली आहे. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरी आणि तिसरी यादी प्रसिद्ध केली जाते.
(हेही वाचा -मलिकांविरोधात ‘या’ प्रकरणी 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल )
…म्हणून प्रवेश घेण्यासाठी केली मुदतवाढ
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी काही जिल्ह्यांनी तसेच काही पालकांनी, संस्थांनी, लोकप्रतिनिधींनी शिक्षण संचालनालयाला विनंती केली होती. त्यामुळे शिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करत २९ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community