मंगल प्रभात लोढांवर खंडणीचा गुन्हा दाखल

पुण्यामध्ये राहणाऱ्या एका महिलेने वरळीतील लोढा पार्कमधील फ्लॅटसाठी ४ कोटी भरले, तरी फ्लॅटचा ताबा न देता उलट दुप्पट रक्कम भरण्यासाठी त्या महिलेवर दबाव टाकल्यात आला. 

पुण्यातील एक महिला वकिलाने मुंबईतील लोढा पार्क येथे साडेपाच कोटी रुपयांत फ्लॅट बुक केला, त्यातील ४ कोटी भरले, तरी ताबा दिला नाही, उलट आणखी ४ कोटी भरण्याचा दबाव टाकला, तसेच न भरल्यास करार रद्द होईल आणि भरलेली रक्कम जप्त होईल, अशी धमकी दिल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून पुण्यातील चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

४ कोटी भरले तरी ताबा दिला नाही! 

तक्रारदार महिलेला मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता. त्यांनी त्यांच्या परिचितांकडे चौकशी केली असता त्यांना वरळीतील लोढा पार्क येथे फ्लॅट घेण्याचे सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी संपर्क केला असता मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचे सुरेंद्रन नायर यांनी पुण्यात येऊन त्या महिलेशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना ५ कोटी ५९ लाख २७ हजार १२७ रुपये फ्लॅटची रक्कम सांगितली. त्यानुसार त्या महिलेने त्यातील ३ कोटी ९२ लाख रुपये भरले. परंतु २०१३ पासून ते आतापर्यंत त्यांना त्या फ्लॅटचा ताबा दिला नाही. उलट त्यांना वेळोवेळी रक्कम वाढवून सांगत आणखी 4 कोटी 15 लाख 15 हजार 386 रुपये भरा अन्यथा तुमचे अग्रीमेंट टू सेल रद्द करण्यात येईल, असे सांगितले. तुमची भरलेली रक्कम फॉरफिचरद्वारे जप्त होईल, अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. वाढीव रक्कम भरण्यासाठी आरोपींनी बळजबरी केली असून, फसवणूक करून खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात त्या महिलेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आमदार मंगल प्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ३८४, ३८५, ४०६, ४२०, १२० (ब) ३४ या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळीतील लोढा पार्क या इमारतीतील 3901 विंग A हा फ्लॅट हडप केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

(हेही वाचा : स्वतःच्या मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून दुसऱ्याच्या मुलाचा दिला नरबळी! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here