रात्रीचा उकाडा जिव्हारी, तापमानाचा नवा रेकॉर्ड

आठवडाभर उन्हाच्या झळांनी दिवसा बाहेर जाणे नकोसे केले असताना मुंबईत शुक्रवारी किमान तापमान वाढीने नवा रेकॉर्ड केला. एप्रिल महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील सर्वात जास्त किमान तापमान शुक्रवारी नोंदवले गेले. शुक्रवारी किमान तापमान २८.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. दिवसाचे तापमान आता उतरण्यास सुरुवात झाली असली तरीही रात्रीच्या उकाड्यापासून अजून दोन दिवस मुंबईकरांची सुटका होणार नाही.

( हेही वाचा : खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध! )

शुक्रवारी कमाल तापमान ३४ अंशापर्यंत कमी झाले असले तरीही शहर आणि उपनगरांत आर्द्रता ८७ आणि ७१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. परिणामी, काही मिनिटांसाठीही दिवसा घराबाहेर राहिल्यास सूर्याच्या तप्त किरणांपेक्षा उकाडा जिव्हारी लागत आहे. रात्रीही आर्देतेत फारसा परिणाम दिसून येत नाही.

१ मे पर्यंत किमान तापमान २७-२८ अंश सेल्सि्सपर्यंत राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत आता दिवसाचे कमाल तापमान हळूहळू स्थिरावेल. गेले काही दिवस मुंबईत भर दुपारी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. परंतु मे महिन्याच्या सुरुवातीला आकाश निरभ्र राहील. रात्रीचे तापमान कमी होण्यासाठी ५ मेपर्यंतची वाट पाहावी लागेल.

शहरांच्या इतर स्थानकांतील कमाल तापमानाच्या नोंदी (अंश सेल्सिअसमध्ये)

  • मुलुंड आणि बोरिवली – ३६.७
  • चेंबूर आणि घाटकोपर – ३६.२
  • कुर्ला आणि सायन – ३५.७
  • माटुंगा – ३५.७
  • सांताक्रूझ – ३४.७
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ३३.६
  • कुलाबा – ३४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here