केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून केली पैशांची मागणी, गुन्हा दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी शक्कल लढवून केलेली फसवणूक आपण सर्वजण ऐकतो. अनेकजण या ठगांचे बळी ठरतात. कुणाचेही नाव सांगून किंवा बनावट अकाऊंट उघडून फसवणूक केली जाते. आता असाच प्रकार समोर आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाने अकाऊंट उघडून पैशांची मागणी केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावतीने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात ठगांविरोधात सायबर कलमानुसार गु्न्हा दाखल करण्यात आला असून, सध्या मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने बनवण्यात आलेले हे अकाऊंट ब्लाॅक करण्यात आले आहे.

नारपोली पोलीसांत गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाने फेक फेसबूक अकाऊंट उघडून अज्ञात ठगाकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या. विशेष म्हणजे याच फेसबुक अकाऊंटवरुन समोरच्या अकाऊंटवरुन 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.  हा प्रकार उघड होताच, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्याअंतर्गत अज्ञात ठगाविरोधात तक्ररा दाखल करण्यात आली आहे.

( हेही वाचा: LPG ग्राहकांना आता वर्षाकाठी केवळ 15 तर महिन्याला मिळणार दोनच सिलेंडर )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here