आता फेसबुक ब्लू टिकसाठी ट्विटरपेक्षाही मोजावे लागणार जास्त पैसे

167

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सअॅपची मूळ कंपनी मेटानेही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. वेबसाठी त्यांची किंमत 11.99 डाॅलर्स आणि iOS साठी 14.99 डाॅलर्स आणि iOS 14.99 डाॅलर्स निश्चित करण्यात आली आहे.

सध्या प्रिमिअम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशांमध्ये या सेवेची सुरुवात केली जाणार आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांचा एक संदेश समोर आला आहे. त्यामध्ये या सेवेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

( हेही वाचा: तुमचा CCTV कॅमेरा अंधारात काम करत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी )

ट्वीटरची यापूर्वीच घोषणा

मायक्रो- ब्लाॅगिंग ट्वीटरने नुकतीच पेड सबस्क्रिप्शन सेवा ट्विटर ब्लू लाॅंच केली. भारतातील मोबाईल युझर्सना ब्लू टिक मिळवण्यासाठी आणि प्रिमियम सबस्क्रिप्शन सेवेचे फीचर्स वापरण्यासाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी, कंपनीने सर्वात कमी किमतीचा प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन 650 रुपयांचा लाॅंच केला. हा प्लॅन वेब युझर्ससाठी आहे. कंपनीने ट्वीटर ब्लू गेल्या वर्षीच जारी केला होता. US, UK, Canada, Australia, New Zealand आणि जपान काही देशांमध्ये तो लाॅंच करण्यात आला होता.

फेसबुककडून ब्लू टिकबाबत काही मोठी घोषणा केली जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. मार्क झुगरबर्गने फेबसुकबाबत ही मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, सरकारी आयडीशिवाय कोणीही त्यांचे अकाऊंट व्हेरिफाईड करु शकणार नाही ही महत्त्वाची बाब आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.