Facebook च्या COO शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा, मार्क झुकरबर्ग म्हणाले…

90

सोशल मीडियातील प्रसिद्ध फेसबुकच्या मूळ कंपनीतील एका अधिकाऱ्यानं राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. कंपनीची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) शेरिल सँडबर्ग 14 वर्षे फेसबुकशी संबंधित होती. स्टार्टअपपासून फेसबुकला एक मोठी सोशल मीडिया कंपनी बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुककडून अधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यांनी एक पोस्ट शेअर करत राजीनाम्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असणार, याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheryl Sandberg (@sherylsandberg)

दरम्यान, असे सांगितले जात आहे की, फेसबुक सार्वजनिक होण्याच्या चार वर्षांपूर्वी आणि कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्गनंतर सर्वात जास्त चर्चेत असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. फेसबुकपूर्वी सँडबर्ग यांनी गुगलमध्येही काम केले होते. त्यांच्या जागी जावियर ऑलिव्हन यांची फेसबुकचे नवे सीओओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – आता Indian Railways ची ‘Queen’ होणार हायटेक, नव्या रुपात सुपरफास्ट धावणार!)

काय केली मार्क झुकरबर्गने पोस्ट

फेसबुकच्या COO शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गनेएक पोस्ट केली. मार्क झुकरबर्गने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, एका 14 वर्षांनंतर युगाचा हा अंत आहे. माझी चांगली मैत्रीण आणि भागीदार शेरिल सँडबर्ग मेटाच्या सीओओ पदावरून पायउतार होत आहे. शेरिल सँडबर्ग फेसबुकसोबत कायम राहतील. शेरिल सँडबर्ग फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा हिस्सा असतील. त्यासोबतच झुकरबर्गने असेही सांगितले की, फेसबुकचा नवा सीओओ कोण असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. जेवियर ओलिवन यांना फेसबुकचं नवं सीओओ बनवण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

It’s the end of an era. After 14 years, my good friend and partner Sheryl Sandberg is stepping down as COO of Meta….

Posted by Mark Zuckerberg on Wednesday, 1 June 2022

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.