नेपाळ विमान अपघातापूर्वीचे फेसबुक लाईव्ह…व्हिडिओ होतोय व्हायरल! चित्तथरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

नेपाळमध्ये विमान अपघातात ७२ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ५ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत परंतु आता या विमानामधील तरूणाचे फेसबुक लाईव्ह सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे अपघातापूर्वी विमानात काय स्थिती होती आणि काही क्षणात परिस्थिती कशी बदलली आणि हा अपघात झाला याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! हार्बर लोकल सेवा ठप्प, प्रवाशांची गैरसोय)

अपघातापूर्वीचे फेसबुक लाईव्ह 

रविवारी नेपाळमधील पोखरामध्ये विमान क्रॅश होऊन भीषण अपघात झाला. या विमानातील एक प्रवासी विमान क्रॅश होण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह होता. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, यति एअरलाईन्सचे हे विमान पोखरा विमानतळाच्या दिशेने जाताना अचानक बिघडते आणि खाली कोसळते यानंतर या विमानाला भीषण आग लागल्याची दृश्य सुद्धा फेसबुक लाईव्हमध्ये दिसत आहेत.

विमान हेलकावे घेतानाचे दृश्य 

दरम्यान रविवारी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोखला येथून आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये विमान हवेत हेलकावे घेत असलेले दिसत आहे. याचवेळी विमान क्रॅश झाले होते आणि त्यानंतर काही क्षणात विमान खाली कोसळून भीषण आग लागली. या अपघातामुळे विमान प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत पोखरा मार्गादरम्यान अनेक विमान अपघात झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here