फेसबुकच्या Mark Zuckerberg चा आज वाढदिवस. जाणून घेऊया मार्कचा जीवनप्रवास

मार्क झुकरबर्ग हे २००८ साली आपल्या वयाच्या तेविसाव्या वर्षीच स्वयंसिद्ध अब्जाधीश झाले होते.

127
फेसबुकच्या Mark Zuckerberg चा आज वाढदिवस. जाणून घेऊया मार्कचा जीवनप्रवास

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांचा जन्म १४ मे १९८४ साली न्यूयॉर्क येथे झाला. त्यांच्या बाबांचं नाव एडवर्ड झुकरबर्ग होतं. ते डेंटिस्ट होते. त्यांच्या आईचं नाव कॅरेन असं होतं. त्या एक मानसोपचार तज्ज्ञ होत्या. मार्क झुकरबर्ग यांचं सुरुवातीचं शिक्षण अर्डस्ले हायस्कूलमध्ये झालं. तिथे ते तलवारबाजी संघाचे कर्णधार होते. त्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी फिलिप्स एक्सेटर अकॅडमी येथे ऍडमिशन घेतलं. (Mark Zuckerberg)

मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे एक अमेरिकन बिझनेसमन आहेत. त्यांनी २००४ साली हावर्ड युनिव्हर्सिटीच्या आपल्या रूममेट्ससोबत ‘फेसबुक’ नावाच्या सोशल मीडिया सर्व्हिस साईट सुरू केली. ‘मेटा प्लॅटफॉर्म’ ही त्याची मूळ कंपनी आहे. मार्क झुकरबर्ग हे या कंपनीचे अध्यक्ष, प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि कंट्रोलिंग शेअर होल्डर्स आहेत. (Mark Zuckerberg)

फेसबुक सुरू केल्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी आपलं हावर्ड युनिव्हर्सिटीतलं शिक्षण आटोपलं. त्यानंतर २०१२ साली मे महिन्यात त्यांनी आपल्या कंपनीचे बरेचसे शेअर्स सार्वजनिक केले. मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे २००८ साली आपल्या वयाच्या तेविसाव्या वर्षीच स्वयंसिद्ध अब्जाधीश झाले होते. त्यानंतर त्यांनी चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्हची स्थापना केली आणि त्या अंतर्गत अनेक सामाजिक कामं करण्यासाठी पुढाकार घेतला. (Mark Zuckerberg)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : दुर्घटनेला लोहमार्ग पोलीसही तेवढेच जबाबदार – गलगली)

‘या’ चित्रपटाने जिंकले अनेक अकॅडमी अवॉर्ड्स

२०१० साली मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या आयुष्य आणि कारकिर्दीचं चित्रण असणारा ‘द सोशल नेटवर्क’ नावाचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक अकॅडमी अवॉर्ड्स जिंकले आहेत. मार्क झुकरबर्ग यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला पुष्कळ अडचणींचा सामना करावा लागला होता. (Mark Zuckerberg)

टेक्निकल बिझनेसमध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची झपाट्याने प्रगती होत होती. त्यामुळेच राजकीय आणि कायदेशीरदृष्टीने समाजमानांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले. फेसबुक लॉन्च केल्यानंतर झुकरबर्ग यांना फेसबुकची निर्मिती, मालकी हक्क, फेसबुक युजर्सची प्रायव्हसी यांसारख्या कितीतरी मुद्द्यांवरून कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. आज ते एक यशस्वी उद्योजक आहेत. (Mark Zuckerberg)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.