देशात आधार कार्ड वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यासोबतच फसवणुकीच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. नुकतीच एक माहिती समोर आली होती की सरकार प्रत्येक आधार कार्ड धारकाला 80 हजार रुपये देणार आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करा.
आधार कार्ड धारकाला 80 हजार रुपये मिळणार, अशा स्वरुपाचा फिरणारा मेसेज हा फेक असून अशा कोणत्याही थापांना बळी पडून नका, अशी माहिती केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक टीमने दिली आहे.
( हेही वाचा: पुतिन असं काय म्हणाले की जगाने सोडला सुटकेचा नि:श्वास )
मेसेज आणि व्हिडीओ फेक
सर्व मुलींना 2 हजार 100 रुपये मिळणार आहेत. सरकार आधार कार्डधारकांना 80 हजार रुपये देणार, असे सांगणारे व्हिडीओ व संदेश व्हायरल झाले होते. मात्र, ते फेक असून कोणालाही फाॅरवर्ड करु नका, असे टीमने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community