बापरे! आता बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचं ‘धारावी पॅटर्न’

92

धारावीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनासमोर नवं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी धारावी पॅटर्न यशस्वी झाला होता. मुंबई महानगरपालिकेच्या धारावी पॅटर्नची चर्चा केवळ मुंबई, महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात झाली होती. मात्र या धारावीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये फेक व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट्सचे जाळे पोलिसांनी उधवस्त केले आहे, काही रुपयांमध्ये लोकांना दोन्ही कोरोना लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट या टोळीकडून दिला जात होतं. इतकंच नाही तर या फेक सर्टिफिकेटची नोंदणी कोविन अॅपवर सुद्धा दिसत होती. ज्यामुळे पोलिसांच्या ही भुव्या उंचावल्या आहेत.

एक हजार रुपयांत सर्रास विक्री

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत असताना धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरण प्रमाणपत्र संदर्भात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या एक हजार रुपयांत लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.

(हेही वाचा – मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांनाच फसवले…)

असे दिले जायचे बनावट प्रमाणपत्र

एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडून हे प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सेकारन फ्रान्सिस नाडर (वय ३६) हा सायबर कॅफे मालक अवघ्या एक हजार रुपयांमध्ये करोना लशीच्या मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पुरवत होता. पोलिसांनी एका ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले. नाडरने त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला धारावी पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आरोपीने यापूर्वी किमान चार जणांचे लसीकरण केल्याची माहिती हाती लागली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडे पाठवण्यात आलेल्या ग्राहकानेही लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन या संकेतस्थळावर दिसते आहे. अधिकृतरित्या लसीकरण केल्यावर दोन मात्रांमधील तुकडी क्रमांक वेगवेगळा असतो. पण याप्रकरणात दोन्ही मात्रा एकाच तुकडीत झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर पोलिसांनीही लोकांना पैसे देऊन असे सर्टिफिकेट न घेण्याचा आवाहन केलं आहे…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.