-
ऋजुता लुकतुके
फॅशन आणि लाईफस्टाईल क्षेत्रातली आघाडीची ई-कॉमर्स कंपनी कुठली असं विचारलंत तर कुठलाही भारतीय नायकाचंच नाव घेईल. नायकाचं मागच्या १३ वर्षांत उभं राहिलेलं साम्राज्य कुणीही नजरे आड करू शकत नाही. पण, व्यवसायाने बँकर असलेल्या फाल्गुनी नायर यांना नायकाची कल्पना सुचली कशी? आणि त्यातून त्यांनी ६५० कोटी अमेरिकन डॉलर कसे निर्माण केले? (Falguni Nayar Net Worth)
(हेही वाचा- Uday Kotak Net Worth : भारतातील सगळ्यात श्रीमंत बँकरची मालमत्ता तुम्हाला ठाऊक आहे?)
१९८५ मध्ये अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीए झाल्यावर जे सगळे करतात तेच खरंतर फाल्गुनी नायर या गुजराती मुलीनं केलं. कॅम्पसमध्येच वाटेला आलेल्या सगळ्यात चांगल्या नोकरीचा प्रस्ताव स्वीकारून ती गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लागली. कोटक महिंद्रा बँकेनं सुरुवातीला तिला चांगल्या संधीही दिल्या. अगदी न्यूयॉर्क आणि लंडनमधील आंतरराष्ट्रीय वित्त बाजार समजून घेण्याची संधीही दिली. २००१ मध्ये ही भारतात परत आली. तरीही सुरुवातीला वेगळा कुठलाच विचार नव्हता. कोटक कॅपिटलची व्यवस्थापकीय संचालक म्हणून तिची नियुक्ती झाली. त्यात ती खुश होती. कारण, अशी संधी कोण नाकारेल, असंच तेव्हा तिलाही वाटलं. (Falguni Nayar Net Worth)
पण, अमेरिकेतील फॅशन व्यवसाय आणि त्यातही तिथे ई-कॉमर्स व्यवसायाची होत असलेली भरभराट जवळून पाहिलेल्या फाल्गुनीच्या मनात उद्योगाची बिजं पेरली गेली होती. एवढ्या मोठ्या पदावरही ती फार काळ टिकली नाही. आपल्या पगारातून साठवलेल्या १० लाख अमेरिकन डॉलरमधून तिने नायका फॅशन ही कंपनी सुरू केलीच. तोपर्यंत तिचं वय होतं ५० आणि ते साल होतं २०१२. ई-कॉमर्सची होत असलेली भरभराट आणि फॅशन, लाईफस्टाईलच्या वस्तू घरपोच मिळण्याची झालेली सोय तसंच भारतात ऑनलाईन व्यवहारांना मिळालेली चालना याचं मिश्रण जुळून आलं. अल्पावधीतच फाल्गुनी यांची ही कंपनी मूल्यांकनाच्या बाबतीत अब्जावधीच्या घरात पोहोचली. (Falguni Nayar Net Worth)
(हेही वाचा- Bomb Threat : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी)
फाल्गुनी यांना भारतातील स्वकर्तृत्वावर मोठी झालेली महिला म्हणून ओळखलं जातं. कुटुंबं किंवा पालकांचा कुठलाही आधार न घेता उभं केलेलं नायकाचं साम्राज्य आता १५ अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर गेलं आहे. फाल्गुनी यांची वैयक्तिक मालमत्ताही साडे सहा अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. २०२४ मध्ये अब्जाधीश भारतीय उद्योजकांच्या फोर्ब्स यादीत त्या ४४ व्या क्रमांकावर आहेत. (Falguni Nayar Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community