जगभरात भारतीयांचा दबदबा कायम आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ असोत किंवा अव्वल अब्जाधीशांची यादी… या सर्वांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्येही भारतीयांचे स्थान कायम आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह 6 भारतीय महिलांचा फोर्ब्सच्या जागतिक 100 सर्वात शक्तिशाली महिला 2022 च्या यादीत समावेश करण्यात आला असून फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे.
(हेही वाचा – MSRTC बसचे ब्रेक फेल झाल्यानं ‘एसटी’ची ३-४ बाईकला धडक, ६ जण ठार अन्…)
सीतारमन यांच्यासह 6 भारतीयांचा समावेश
अर्थमंत्री सीतारमन यांच्यासह जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट झालेल्या भारतीय महिलांमध्ये बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ आणि Nykaa च्या संस्थापिका फाल्गुनी नायर यांचा समावेश आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या फोर्ब्सच्या यादीत यंदा सहा महिलांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तर HCL टेक चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा फोर्ब्सच्या यादीत 53 व्या स्थानी आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच या जगातील 54व्या सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. या यादीतील पुढचं भारतीय नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) च्या अध्यक्षा सोमा मंडल यांचं असून त्यांनी 67 वे स्थान मिळवले आहे.
यादीत हे नाव पहिल्या स्थानी
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी जगातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून फोर्ब्सच्या यादीत अवल्ल स्थान पटकावले आहे. तर गेल्या वर्षी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी हे स्थान मिळवले होते. या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लगार्ड हे दुसऱ्या क्रमांकावर तर भारतीय वंशाच्या अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून स्थान देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community