केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राज्यांचे आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिव आणि ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्यांच्या माहिती आयुक्तांशी संवाद साधला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी डिजिटल बैठक झाली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल हे देखील उपस्थित होते.
नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक
यावेळी बोलताना मांडविया म्हणाले, “कोविड विरुद्धचा लढा हा एक संयुक्त प्रयत्न आहे आणि केंद्र आणि राज्यांची संयुक्त जबाबदारी आहे आणि मला आनंद आहे की आपण या सार्वजनिक आरोग्य आव्हानाला एकजुटीच्या भावनेने तोंड दिले. यासह कोविड विषाणूचा प्रकार कुठलाही असला तरी, ‘चाचणी-शोध -उपचार-लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तनाचे पालन’ हे कोविड व्यवस्थापनासाठी योग्य धोरण कायम राहील. “बहुतेक राज्यांमधील उपचाराधीन रुग्णसंख्या आणि संक्रमणाच्या दरात गेल्या दोन आठवड्यात घसरण दिसून आली आहे, तरीही नागरिकांनी सतर्क (जागरूक) राहणे आवश्यक आहे आणि आपले प्रतिबंधात्मक उपाय कमी करू नयेत.
(हेही वाचा – राऊतांचा वाइन उद्योगाशी संबंध काय? सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल म्हणाले… )
लसीकरणाला गती देण्याची केली सूचना
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना विद्यमान आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि गरजेनुसार नवीन सुविधा तयार करण्यासाठी ईसीआरपी -II निधीचा पूर्ण आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार केला. ईसीआरपी -II अंतर्गत निधी 31 मार्च 2022 रोजी संपणार असल्याने, राज्यांना नियमितपणे प्रगतीचा आढावा घेण्याची विनंती करण्यात आली, कारण ही आरोग्यविषयक पायाभूत सुविधा केवळ सध्याच्या महामारीच्या काळातच वापरली जाणार नाही, तर भविष्यातही लोकांसाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी त्यांना पीएसए प्लांट्स, द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा आणि एमजीपीएसची उभारणी आणि ते कार्यान्वित करण्याची आठवण करून दिली. महामारी व्यवस्थापनासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगून डॉ. मांडविया यांनी राज्यांना सर्व पात्र लोकसंख्येचे, विशेषत: 15-17 वयोगटातील आणि ज्यांची लसीची दुसरी मात्रा घ्यायची वेळ आली आहे, अशा लोकांच्या लसीकरणाला गती देण्याची सूचना केली.
Join Our WhatsApp Community