सांगलीत ९ जणांची सामूहिक आत्महत्या, २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एकाच कुटुंबातील ९ जणांच्या सामूहिक मृत्यूप्रकरणी सांगली पोलिसांनी सोमवारी जिल्ह्यातील २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या प्रकरणात कथित आत्महत्या केल्याचा संशय आहे. मुंबईपासून ३५० किमी अंतरावर असलेल्या सांगली या पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घरात मृतदेह सापडले आहेत.

मृतांच्या मृत्यू नेमका कशामुळे, तपास सुरू

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, “या प्रकरणी २५ जणांविरुद्ध आयपीसी कलम ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.” यासह पोलिसांनी असेही सांगितले की, सांगलीतील म्हैसाळ येथील एका घरातून मृतदेह सापडल्यानंतर, शोध मोहिमेत पोलिसांना सुसाईड नोट सापडली. मृतांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

(हेही वाचा – सांगली हादरली! एकाच कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या)

आत्महत्या केलेल्यामध्ये या ९ जणांचा समावेश

“कुटुंबातील सामूहिक आत्महत्येचे प्रकरण आहे की नाही याचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथमदर्शनी हे कुटुंब कर्जबाजारी असल्याचे आणि सावकार कुटुंबावर दबाव आणत असल्याचे दिसते, त्यामुळे आम्ही सावकारांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत,” असे अधिकाऱ्याने सांगितले. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here