सांगली हादरली! एकाच कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या

कर्जाच्या बोजाखाली येऊन घराच्या कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र एकाच कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे, त्यामुळे सांगली हादरुन गेली आहे. या कुटुंबातील सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली. आर्थिक कारणामुळे या आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोन भावांनी कुटुंब संपवले 

मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. विष पिऊन कुटुंबाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवले. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी, २० जून रोजी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

(हेही वाचा यावेळी आम्हाला गृहीत धरू नका, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मनसेच्या आमदाराचे विधान)

घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here