पालकांसाठी महत्त्वाचे; ‘या’ अॅपद्वारे आपल्या मुलांवर डिजिटल लक्ष ठेवा!

151

आज लहान मुलांच्या हातात मोबाइल आला आहे आणि यामुळे अनेक पालक चिंताग्रस्त असतात. त्यांना सतत असं वाटत असतं की आपलं मूल चुकीच्या साईट्स, ऍप्स तर पाहत नसेल ना? बरं, मुलांना याबाबतीत विचारलं की मुलं भडकतात. त्यांच्यावर पाळत ठेवलेली, त्यांना अतिरिक्त प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. आजच्या युगाच्या मुलांना कंट्रोल करणं इतकं सोपं काम नाही.

कोणतीही वेबसाइट ब्लॉक करू शकता

पण आता तुम्हाला काळजी करायची मुळीच गरज नाही. कारण एका अॅपच्या मदतीने या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता. पालक मुलांच्या स्मार्टफोनवर लक्ष ठेवू शकतात आणी तेही मुलांना कळू न देता हा खास अॅप पालकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या मोबाइल अॅपद्वारे मुलांच्या ऑनलाइन गोष्टींवर लक्ष ठेवता येईलच, त्याचबरोबर तुम्ही या अॅपच्या मदतीने कोणतीही वेबसाइट ब्लॉक करू शकता आणि मुलांना कोणता कॉल येतो आणि कोणता नाही यावर देखील नियंत्रिण मिळवू शकता.

(हेही वाचा दुबईत राहणारा भारतीय ड्रायव्हर एका रात्रीत झाला करोडपती! कसा झाला हा चमत्कार?)

तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल

या अॅपचं नाव आहे famisafe parental control app. आजच्या काळात बहुतेक लोक स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरच वेळ घालवतात. मुलांना गेम्स खेळायला आणि कार्टून व्हिडिओ बघायला आवडतात. बर्‍याचदा मुलं मैदानी खेळ खेळण्याऐवजी मोबाइलवर चिकटून असतात. तासनतास मोबाइल वेळ घालवणार्‍या मुलांना पाहून पालकांना खूप टेन्शन येतं. त्यामुळेच हा अॅप बनवण्यात आला आहे. हा अॅप Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला मुलांच्या मोबाइलवर हा अॅप डाऊनलोड करुन चिल्ड्रन मोड ऑन करावा लागेल. त्यानंतर स्वतःच्या मोबाइलवर अॅप डाऊनलोड करुन पॅरेम्ट्स ऑप्शनवर क्लिक करा. आता दोन्ही स्मार्टफोन तुम्ही या अॅपद्वारे कनेक्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना स्मार्टफोन देऊन निवांत राहू शकाल. ते काय पाहतात, कोणता ऍप वापरतात आणि त्यांची ब्राऊजर हिस्ट्री देखील तुम्ही चेक करु शकता. आहे की नाही जबरदस्त अॅप?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.