जॉन बॉन जोवी (Jon Bon Jovi) याचा जन्म २ मार्च १९६२ साली न्यू जर्सी या ठिकाणी झाला. त्याचे वडील इटालियन आणि स्लोव्हाक वंशाचे होते. तर आई जर्मन आणि रशियन वंशाची होती. जॉनचं शिक्षण न्यू जर्सी इथल्या सेंट जोसेफ हायस्कुलमधून झालं. उन्हाळ्याच्या सुट्टीत जॉन आपल्या आजी आजोबांकडे राहायला जायचा. तिथे तो वृत्तपत्रे विकून काही प्रमाणात पैसे कमवायचा. (Jon Bon Jovi)
जॉन बॉन जोवी (Jon Bon Jovi) हा एक प्रोफेशनल अमेरिकन गायक आहे. एवढंच नव्हे तर तो एक गिटार वादक, गीतकार आणि अभिनेताही आहे. जॉन याने १९८२ साली एका रॉक बँडची सुरुवात केली. जॉनचे त्याच्या बँडच्या माध्यमातून पंधरा स्टुडिओ अल्बम्स आणि दोन सोलो अल्बम्स रिलीज केले आहेत. (Jon Bon Jovi)
(हेही वाचा – Match Fixing in Domestic Cricket? श्रीवत्स गोस्वामीची कोलकाता क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगची तक्रार)
सोळा वर्षांचा असताना जॉनने या नावाचा बँड केला सुरू
१९९० साली जॉनने (Jon Bon Jovi) आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. जॉनने आतापर्यंत मूनलाईट, व्हॅलेंटीनो, लिडिंग मॅन, होमटाऊन, पे-ईट फॉरवर्ड, यू-५७१ आणि क्राय वूल्फ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. याव्यतिरिक्त त्याने सेक्स अँड द सिटी, ३० रॉक, एली मॅकबेल आणि द वेस्ट विंग नावाच्या टीव्ही कार्यक्रमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. (Jon Bon Jovi)
जॉनने (Jon Bon Jovi) सर्वात आधी १९७४ साली वयाच्या तेराव्या वर्षी शाळेच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका रेझ नावाच्या बँडची सुरुवात केली. तेव्हापासूनच जॉन संगीताशी जोडला गेला. त्यानंतर सोळा वर्षांचा असताना त्याने अटलांटिक सिटी एक्सप्रेस वे नावाचा बँड सुरू केला. त्या बँडमध्ये नंतर डेव्हिड ब्रायनही सामील झाला होता. १९८९ साली न्यू जर्सी सिंडिकेट टूरवर असताना एकदा जॉन लॉस एंजलीस येथे थांबला होता. त्यादरम्यान त्याने कोणालाही न सांगता लॉस वेगास येथे जाऊन त्याच्या हायस्कूलमधली प्रेयसी डोरोथिआ हर्ले हिच्याशी लग्न केलं. या दाम्पत्याला चार मुलं आहेत. (Jon Bon Jovi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community