Louis Pasteur : रेबीजची लस बनवणारे प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर

413
Louis Pasteur : रेबीजची लस बनवणारे प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर
Louis Pasteur : रेबीजची लस बनवणारे प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर

लुईस पाश्चर (Louis Pasteur) यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ रोजी फ्रान्स येथे झाला. लुई पाश्चर हे एक फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ (Chemist) आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) होते जे त्यांच्या लसीकरण, किण्वन आणि पाश्चरायझेशनच्या (Pasteurization) तत्त्वांच्या शोधांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी रसायनशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे रोगांची कारणे आणि प्रतिबंध समजून घेण्यात, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि आधुनिक औषधांचा पाया घालण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

(हेही वाचा – Ram Mandir Sam Pitroda : राममंदिराचा ट्रेंड माझ्यासाठी त्रासदायक; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना राममंदिराविषयी पोटशूळ)

त्यांच्या कामगिरीतील महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी रेबीजची लस बनवली होती. त्याचबरोबर अँथ्रॅक्स लसी देखील विकसित केल्या होत्या. भारताने ज्याप्रमाणे कोरोनाची लस बनवून कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले. त्याचप्रमाणे त्या काळी लाखो लोकांचे जीव वाचवण्याचे श्रेय पाश्चर यांना जाते.

त्यांना “बॅक्टेरियोलॉजीचे जनक” (Father of Bacteriology) आणि “मायक्रोबायोलॉजीचे जनक” (Father of Microbiology) म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यांनी स्पॉंटेनियस जनरेशनचा सिद्धांत मोडून आपला नवा सिद्धांत मांडला. ते म्हणाले की, निर्जंतुकीकरण आणि सीलबंद फ्लास्कमध्ये काहीही विकसित होत नाही. उलटपक्षी खुल्या फ्लास्कमध्ये सूक्ष्मजीव वाढू शकतात. विशेष म्हणजे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवले.

(हेही वाचा – Israel Embassy Attack : इस्रायलने जारी केल्या भारतातील इस्रायलींसाठी सूचना !)

लुईस (Louis Pasteur) यांच्या सिद्धांतामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असे म्हटले तरी खोटे ठरणार नाही. त्यांनी पाश्चरायझेशन ही नवी प्रक्रिय अशोधू काढली, ज्यात बॅक्टेरियाचा संसर्ग रोखण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध लावून सर्वसामान्यांना जणू नवी दिशा दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.