शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (S. L. Kirloskar) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे सुपुत्र होते. त्यांचा जन्म २७ मे १९०३ साली सोलापूर जिल्ह्यात झाला. त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीतील एम.आय.टी. विभागातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. एम.आय.टी. येथून पदवी मिळवणाऱ्या पहिल्या काही भारतीयांपैकी एक शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर हे होते. (S. L. Kirloskar)
१९१० साली शंतनुरावांचे वडील लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कुंडल रोड नावाच्या प्रसिद्ध रेल्वे स्थानकाच्या शेजारच्या रखरखीत पडीक जमिनीवर आपला कारखाना सुरू केला. हा कारखाना आता प्रसिद्ध किर्लोस्कर इंडस्ट्रीज म्हणून ओळखला जातो आणि त्या रेल्वे स्टेशनचं नाव किर्लोस्करवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. (S. L. Kirloskar)
लक्ष्मणराव किर्लोस्कर हे फक्त उद्योगपती नव्हते तर ते समाजसुधारकही होते. ग्रामीण भागात अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पळुस येथील किर्लोस्करवाडी येथे स्थापन केलेल्या वस्तीत अस्पृश्यतेविरोधात लोकांना जागरूक केलं. लक्ष्मणरावांचा समाजसुधारणेवर खूप विश्वास होता. तसेच माणसाच्या चांगुलपणावर आणि माणुसकीवर त्यांचा विश्वास होता. (S. L. Kirloskar)
(हेही वाचा – शरद पवारांना वाटणाऱ्या भीतीमुळे राष्ट्रवादीचा 2004 मध्ये मुख्यमंत्री झाला नाही; Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट)
लक्ष्मणरावांनी युरोप आणि अमेरिकेतल्या औद्योगिक टाऊनशिपबद्दल वाचलं होतं. त्या टाऊनशिपमध्ये मोठ्या उद्योगांच्या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहती बांधल्या होत्या. त्याप्रमाणेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चा उद्योग आणि वसाहत उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न त्यांनी किर्लोस्करवाडी येथे पूर्ण केलं. इथे त्यांनी १९१० साली ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ नावाचा कारखाना सुरू केला. (S. L. Kirloskar)
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, किर्लोस्कर समूहाची एस. एल. किर्लोस्कर (S. L. Kirloskar) यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढ झाली. १९४६ साली त्यांनी ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी’ आणि ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ या कंपन्यांची अनुक्रमे बंगळुरू आणि पुणे येथे स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आयातीसाठी पर्याय म्हणून डिझेल इंजिनचे स्वदेशी उत्पादन विकसित करण्याचं श्रेय त्यांना जातं. (S. L. Kirloskar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community