इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ – James Clerk Maxwell

James Clerk Maxwell : मैक्सवेल यांचा जन्म एडिनबर्ग (स्कॉटलंड) येथे १३ जून १८३१ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एडिनबर्ग आणि केंब्रिज विद्यापीठात झाले.

167
इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - James Clerk Maxwell
इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - James Clerk Maxwell

जेम्स क्लार्क मैक्सवेल (James Clerk Maxwell) हे स्कॉटलंड येथील प्रख्यात गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी १८६५ मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा सिद्धांत मांडला होता, ज्यामुळे रेडिओ आणि टेलिव्हिजनचा शोध शक्य झाला. मैक्सवेल (James Clerk Maxwell) यांचा जन्म एडिनबर्ग (स्कॉटलंड) येथे १३ जून १८३१ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एडिनबर्ग आणि केंब्रिज विद्यापीठात झाले. (James Clerk Maxwell)

१८५६ ते १८६० दरम्यान ते मार्शल कॉलेज, ॲबरडीन येथील नैसर्गिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९६० ते १८६८ दरम्यान ते लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे प्राध्यापक होते. १८६८ मध्ये ते निवृत्त झाले, पण १८७१ मध्ये त्यांना पुन्हा केंब्रिजमधील प्रायोगिक भौतिकशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध कॅंबेंडिश प्रयोगशाळेची रूपरेषा आखण्याय आली. (James Clerk Maxwell)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेला ७ गडी राखून हरवत भारताचा सुपर ८मध्ये प्रवेश )

जेम्स क्लार्क मैक्सवेल (James Clerk Maxwell) यांनी शास्त्रीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत, चुंबकत्व आणि ऑप्टिक्स या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे मानवजातीला विज्ञानाच्या अगदी जवळ जाता आले. मैक्सवेल (James Clerk Maxwell) यांनी प्रकाश ही विद्युत चुंबकीय लहरी असून ती माध्यमापासून स्वतंत्र आहे अशी कल्पना मांडली. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या क्षेत्रात मैक्सवेल यांनी केलेले कार्य हे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील न्यूटननंतरचे दुसरे सर्वात मोठे कार्य मानले जाते. (James Clerk Maxwell)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.