प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

101

जागतिक किर्तीचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

या पुरस्कारांनी सन्मानित

पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1985 मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्याची मानद नागरिकता सुद्धा मिळाली आहे. शिवकुमार यांना सन 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. 1991 साली पद्मश्री, 2001 मध्ये पद्म विभूषण या सन्मानाने पंडितजी यांना सन्मानित करण्यात आले होते.

( हेही वाचा: महाराष्ट्रात आडनावं बघून कारवाई केली जाते; आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात )

आईची इच्छा केली पूर्ण

पंडित शिवकुमार यांचा जन्म 13 जानेवारी 1938 मध्ये झाला. ते मूळचे जम्मू येथील रहिवाशी आहेत. आईच्या इच्छेनुसार, त्यांनी संतूर वादनास सुरुवात केली. शिव कुमार यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि आपल्या आईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण त्यांनी 1955 मध्ये मुंबईत केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.