Ameen Sayani : आकाशवाणीचा भारदस्त आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन

343

आकाशवाणीवर एकेकाळी बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अवघ्या देशाला भुरळ पाडली होती. कारण त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीन सयानी (Ameen Sayani) करत होते. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे आकाशवाणी एका भारदस्त आवाजाला हरपली आहे.

(हेही वाचा Muslim : छत्रपती संभाजी नगरातून अटक केलेला महमंद झोएब खान करणार होता हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ले)

हृदयविकाराचा झटका आला

अमीन सयानी (Ameen Sayani) यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. सयानी यांचे पुत्र रजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुरोजा दिला आहे. अमीन सयानी यांच्या मृत्यूबाबत माहिती देताना रजिल सयानी यांनी सांगितले की, अमीन सयांनी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर  त्यांना त्वरित एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अमीन सयानी (Ameen Sayani) यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. कारण आज त्यांचे काही नातेवाईक मुंबईमध्ये अंत्यदर्शनासाठी येणार आहेत. सयानी यांचा जन्म २१ डिसेबर १९३२ रोजी मुंबईत झाला होता. अमीन सयानी यांनी भारतीय रेडिओच्या जगतामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली होती. आकाशवाणीच्या उत्कर्षाच्या काळात अमीन सयानी यांच्या आवाजाच्या जादूने श्रोत्यांवर भूरळ घातली होती. अमीन सयानी यांनी रेडिओ निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणी, मुंबईमधून केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.