सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार Hemant Kumar

Hemant Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ते हेमंत कुमार या नावाने प्रसिद्ध होते.

202
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार Hemant Kumar
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार Hemant Kumar

हेमंत कुमार (Hemant Kumar) मुखोपाध्याय हे प्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि निर्माते होते. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ते हेमंत कुमार (Hemant Kumar) या नावाने प्रसिद्ध होते.

हेमंत कुमार (Hemant Kumar) यांचा जन्म १६ जून १९२० साली वाराणसी येथे झाला. त्यांचं बालपण बंगाल इथल्या एका गावात गेलं. त्यांच्या गावामध्ये लोकसंगीत आणि नाटकांचे कार्यक्रम होत असत. लहानपणापासूनच हेमंत कुमार (Hemant Kumar) यांना संगीताविषयी रुची वाढू लागली. जसजसं ते मोठे होत गेले तसतसं त्यांचं संगीतातलं ज्ञान वाढत गेलं. पण हेमंत कुमार (Hemant Kumar) यांना संगीताचं औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. त्यांच्या कुटुंबातील कोणीही संगीत क्षेत्राशी संबंधित नव्हतं.

(हेही वाचा- Central Railwayने दोन महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडुन केला तब्बल ६३ कोटींचा दंड वसूल!)

कलकत्ता येथे कॉलेजमध्ये शिकताना हेमंत कुमार (Hemant Kumar) यांनी आकाशवाणीवर गाण्याची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आणि आकाशवाणीवर गाणी गायला लागले.

गाण्यासोबतच हेमंत कुमार (Hemant Kumar) यांना साहित्यक्षेत्रातही रुची होती. त्यांनी लिहिलेली लघुकथा आणि त्यांनी गायलेलं गाणं हे दोन्ही खूप गाजलं. मग त्यांनी फक्त वर्षभर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा अभ्यास केला आणि त्यानंतर ते पूर्णवेळ संगीत क्षेत्रात काम करायला लागले

१९४० साली ‘निमोई संन्यासी’ नावाच्या बंगाली चित्रपटासाठी गाणं गायलं. त्यानंतर १९४४ साली ‘इरादा’ या हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी गाणं गायलं होतं. अशाप्रकारे त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी बंगाली संगीतकार हरी प्रसन्न दास यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी १९४५ साली पुर्बोरंग नावाच्या बंगाली चित्रपटाला संगीत दिलं. त्यानंतर १९५२ साली ‘आनंदमठ’ नावाच्या हिंदी चित्रपटालाही त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून संगीत दिलं. (Hemant Kumar)

(हेही वाचा- Crime News : पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या)

१९५४ साली त्यांनी ‘नागीन’ या हिंदी चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटाची गाणी खूप गाजली. या चित्रपटासाठी हेमंत कुमार  (Hemant Kumar)यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही देण्यात आला होता. तसेच गायक म्हणूनही हेमंत कुमार (Hemant Kumar) यांनी त्या काळच्या सर्व प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसाठी गाणी गायली होती. (Hemant Kumar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.