एल.व्ही. वैद्यनाथन (L.V. Vaidyanathan) हे एक प्रसिद्ध मृदा वैज्ञानिक आहेत. एल.व्ही वैद्यनाथन (L.V. Vaidyanathan) यांचा जन्म ३१ मे १९२८ साली केरळमधल्या पलक्कड नावाच्या गावात झाला. त्यांचं प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजमधलं शिक्षण त्याच गावात झालं. त्यांनी पलक्कड इथल्या गव्हर्नमेंट व्हिक्टोरिया कॉलेजमधून मृदा विज्ञान या विषयात पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. (L.V. Vaidyanathan)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावला! आतापर्यंत कोणाच्या किती सभा ?)
त्यानंतर त्यांनी त्रिशूर इथल्या सेंट मेरी नावाच्या कॉलेजमध्ये एक लेक्चरर म्हणून तीन वर्षं रसायनशास्त्र या विषयावर काम केलं. त्यानंतर ते इंडिया कॉफी बोर्ड येथे सेंट्रल कॉफी रिसर्च इन्स्टिट्यूट येथे सल्लागार म्हणून काम करू लागले. सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सी.एफ.टी.आर.आय. आणि वैज्ञानिक, औद्योगिक संशोधन परिषद म्हणजेच सी.एस.आय.आर. आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच आय.सी.ए.आर यांच्याशी संलग्न असलेली त्यांची प्रशिक्षण संघटना होती. (L.V. Vaidyanathan)
रोथमस्टड एक्सपेरिमेंटल स्टेशन येथे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याकरिता एल.व्ही. वैद्यनाथन यांनी इंग्लंडला जाऊन तिथे ऍडमिशन घेतलं. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, तिथे त्यांनी ओ. तालिबुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली मातीतल्या फॉस्फरसवर संशोधन केलं आणि पी.एच.डी. ही पदवी मिळवली. (L.V. Vaidyanathan)
(हेही वाचा- Monsoon चा पाऊस हवामान विभाग कोणत्या निकषांवर ओळखते ?)
त्यानंतर एल.व्ही. वैद्यनाथन (L.V. Vaidyanathan) यांनी इसोटोप स्कुल येथे अल्प काळासाठी काम केलं. मग त्यांनी ऑक्सफर्ड येथे पी.न्ये. यांच्यासोबत मातीतल्या आयन डिफ्युशन्सवर काम केलं. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कुल ऑफ ऍग्रीकल्चर येथे मृदा विज्ञान विभागामध्ये संशोधन केलं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं. (L.V. Vaidyanathan)
त्यानंतर व्हिएन्ना येथे ऑस्ट्रियाच्या सेबर्सडॉर्फ नावाच्या प्रयोगशाळेत FAO-IAEA या ॲग्रिकल्चरशी संलग्न असलेल्या विभागात सल्लागार म्हणून एल.व्ही. वैद्यनाथन यांनी एक वर्षं काम केलं. त्यांच्यावर ईसोटोपीक ट्रेस युजच्या सदस्य देशांतल्या शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. यामध्ये तेहरान विद्यापीठातल्या असाइनमेंटचा समावेश होता. ADAS मध्ये सामील होण्यासाठी वैद्यनाथन हे १९७० साली युनायटेड किंग्डमला परतले. (L.V. Vaidyanathan)
ते ADAS सामाजिक विज्ञान प्रदूषण आणि कचरा उत्पादने समितीचे सचिव होते आणि माती-पीक-पाणी संबंधातील राष्ट्रीय विशेषज्ञ होते. तसेच ते बायोलॉजिकल अँड केमिकल सायन्सेस विभाग, एसेक्स युनिव्हर्सिटी आणि केमिस्ट्री ऑफ सॉइल कोलॉइड्स ग्रुप, स्कूल ऑफ केमिस्ट्री, बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसरही होते. (L.V. Vaidyanathan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community