पुण्यातील प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ अनिलकुमार खैरे यांचे रविवारी अल्पशा आजाराने दुपारी निधन झाले. सर्पउद्यानाचे प्रमुख तसेच प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ निलिमकुमार यांचे ते कनिष्ठ भाऊ होते. कित्येक प्राणीप्रेमी संस्थांना साप पकडण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण बंधू निलिमकुमार खैरे यांच्यासह अनिलकुमार खैरे यांनी दिले.
काही दिवसांपूर्वी सर्पउद्यानाचे कामकाजही अनिलकुमार खैरे पूर्णपणे सांभाळू लागले होते. पुणे वनविभागाशी बोलून बोगस सर्पमित्रांबाबत ठोस उपाययोजना करण्याकडेही दोन्ही खैरे बंधूनी आग्रही भूमिका मांडली होती. मात्र काही महिन्यांपासून अनिककुमार खैरे यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे साप पकडण्याविषयी संस्थाशी संलग्न चर्चासत्रात त्यांनी सहभाग कमी नोंदवला होता. गेल्या आठवड्यांत अनिलकुमार खैरे यांची तब्येत अजूनच खालावली. अखेर रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात मुलगा तेजस तसेच बंधू निलिमकुमार आणि वहिनी असा परिवार आहे. रात्री उशिराने वैकुंठस्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
( हेही वाचा: ‘‘…तर नातवाला मी शिवाजी महाराजांची ‘ही’ गोष्ट सांगेन’’; काय म्हणाले राज ठाकरे? )
Join Our WhatsApp Community