Bindas Kavya: औरंगाबादची काव्या सापडली थेट मध्यप्रदेशात; नेमके प्रकरण काय?

132

बिंदास काव्या या फेमस युट्यूबरचे 43 लाखांहून अधिक फाॅलोअर्स आहेत, ज्या काव्याच्या व्हिडिओची सोशल मीडियात सातत्याने चर्चा असते तीच औरंगाबादची काव्या ही शुक्रवारपासून गायब होती. आता या युट्यूबर बिंदास काव्याचा शोध लागला असून,ती मध्यप्रदेशातील इटारली येथे पोलिसांना सापडली आहे.

मनमाडपासून ती लखनऊला जात असताना इटारसी येथे पोलिसांना आढळली. बेपत्ता होताच काव्याच्या आईने एक व्हिडिओ सोशल मीडियारवर टाकला होता. त्यानंतर अधिक चर्चेत आलेली काव्या 24 तास उलटून जाण्यापूर्वीच सापडली आहे.

( हेही वाचा: देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे )

असा होता काव्याचा प्लॅन

घरातून रागाच्या भरात निघून गेलेली काव्या ही मनमाडहून थेट लखनऊकडे निघाली होती. दरम्यान, मध्य प्रदेशातील इटारसी येथे आली असता, ती पोलिसांनी सापडली. शुक्रवारी औरंगाबादहून मनमाड आणि तेथून थेट लखनऊकडे जाण्याचा तिचा मानस होता. मात्र, ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती इटरासी येथील पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन ती सापडली आहे.

सोशल मीडियामध्ये काव्या फेमस

बिंदास काव्या या युट्युबरचे 43 लाखांहून अधिक फाॅलोअर्स आहेत. तर त्याच तुलनेत फेसबुक पेजवरही तिला फाॅलो केले जाते. गेल्या 5 वर्षांपासून ती युट्यूबवर सक्रिया आहे. एवढेच नाही तर आई- वडिलांच्या मदतीनेच ती हे युट्यूब चॅनल हाताळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.