थोटा थरानी (Thota Tharani) हे दक्षिण भारतातले प्रख्यात कला दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९४९ रोजी झाला. थोटा थरानी यांनी १९७१ मध्ये म्युरल पेंटिंगमध्ये (Mural Painting) पदवीधर डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांना प्रिंट-मेकिंगचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्स सरकारकडून फेलोशिप देण्यात आली. तसेच त्यांनी लंडन आणि नवी दिल्ली येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधून (Royal College of Art) प्रिंट मेकिंग अभ्यासक्रम पूर्ण केला.
थोता थाराणी यांनी त्यांच्या वडिलांना मदत म्हणून लहानपणीच काम सुरु केले. १२ वर्षांचे असतानाच ते सेट डिझाइन करण्याचे काम करु लागले. अर्जुन (Arjuna), दशावथारम (Dasavathaaram), कांथास्वामी (Kanthaswamy) आणि लीडर (Leader) या तेलगू चित्रपटासाठी त्यांनी मदुराई मीनाक्षी मंदिराचा विशाल सेट तयार केला होता. त्यासाठी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला होता.
त्यांनी नायकन आणि इंडियन या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले आहे. या कामासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १०० हून अनेक चित्रपटांसाठी प्रोडक्शन डिझाइनर म्हणून काम केले आहे.
(हेही वाचा – Darshan Pass: शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन पास देण्याबाबत कडक धोरण अवलंबण्याची परवानगी)
त्याचबरोबर पोंडिचेरी, डेर्नियर कॉम्पटोइर डेस इंदेस (फ्रेंच), हनुमान (फ्रेंच) आणि ब्रँची (इटालियन) या तीन परदेशी चित्रपटांसाठीदेखील प्रॉडक्शन डिझायनर (Production Designer) म्हणून काम केले आहे. त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना २००१ मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community