मराठवाड्यातील शेतकऱ्याची कन्या अमेरिकेच्या नौदलात बनली फ्लाइट कमांडर

107

नांदेड जिल्ह्यातील कोंढा या गावातील रेवा दिलीप जोगदंड या युवतीने तिच्यातील उत्तुंग आत्मविश्वासाच्या जोरावर अमेरिकेतील नेव्हल एअरफोर्स फ्लाइट कमांडर या पदाला गवसणी घातली. एका शेतकरी कन्येने सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्व गाजवले.

बालपणापासून घेतलेली प्रेरणा 

दोन वर्षांपासून रेवा हिने अथक परिश्रम घेतले होते. या पदासाठी अमेरिकेत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २६ जणांची निवड झाली. त्यातून एकमेव रेवा जोगदंडची फ्लाइट कमांडरपदी वर्णी लागली आहे. कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांनी स्ट्रिंग कंट्रोल्ड दोरीवर विमान उडवून दाखविणे यावर संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. रेवा हिने बालपणातच यातून प्रेरणा घेतली. तेव्हापासून तिने पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यातही उतरले. अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे ३०० उंबरठ्याचे गाव असून येथील व्यवसाय हा शेती आहे. शेती व्यवसायातून काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सतत नवनवीन प्रयोग केले जातात. अशात तेथील शेतकरी कुटुंबातील रेवा हिने विदेशात जाऊन गावाचे नाव रोशन केले आहे.

(हेही वाचा भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंड क्रिकेट संघाचा सुफडासाफ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.