भारत खुला है: नेटक-यांनी ‘भारत बंद’ आंदोलनाची उडवली खिल्ली

शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी भारत बंदची हाक दिली होती. पण, खरं पाहता भारत बंद नसल्याचंच चित्र दिसून आलं.

सुधारित शेतकरी कायद्यांचा शेतकरी वर्गाकडून विरोध करण्यात आला. पण शेतक-यांना उगाच भडकवण्याचं काम केलं गेलं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. यात खलिस्तानी संघटनेचाही हात असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
27 सप्टेंबरला कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी भारत बंदची हाक दिली होती. पण, खरं पाहता भारत बंद नसल्याचंच चित्र दिसून आलं.

नेटक-यांनी ‘भारत बंद’ विरुद्ध ‘भारत खुला है’ असे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड केले आहेत. नेटक-यांनी आपल्या शहराचे, परिसराचे तसेच बाजारातील फोटो शेअर करुन भारत बंद विफल ठरल्याचं दाखवलं आहे. एका नेटक-याने खुद्द शेतकरीच आपल्या शेतात काम करत असल्याचा फोटो ट्विटरवर शेअर करत, शेतकरी हे भारताचा कणा असल्याचं त्यात म्हटलं आहे.

आलोक तिवारी या नेटक-याने आपल्या दुकानाचा फोटो शेअर करत आपलं दुकान उघडं असल्याचं आणि आपण शेतक-यांचे समर्थक आहोत, कॉंग्रेसचे नाही असं म्हणत #भारत खुला है ला आपलं समर्थन दर्शवलं आहे.

भारत खोट्या शेतक-यांचं समर्थन करणार नाही आणि खरे शेतकरी हे सरकारच्या सुधारित कायद्यांचे समर्थन करणारे आहेत, असं एका नेटक-याचं म्हणणं आहे. या कृषी कायद्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणा-या शेतक-यांचा फोटो शेअर करत, हे खरे शेतकरी असल्याचं त्याने म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here