आता FASTag जाणार! Recharge चीही गरज नाही, मग टोल कसा भरणार?

94

FASTag येऊन काहिच दिवस झाले, मात्र ही प्रणाली सरकारच्या काही पचनी पडली नसल्याचे दिसून येत आहे. आता यापेक्षाही नवीन हायटेक प्रणाली टोल वसुलीसाठी राबविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे FASTag ला लवकरच गुडबाय करावे लागणार आहे. केंद्र सरकार जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे.

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)

युरोपच्या धर्तीवर अशी आहे सरकारची योजना

मिळालेल्या माहितीनुसार, टोल वसुलीसाठी सरकार नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यावर अंमलबजावणी झाली तर FASTag तंत्रज्ञानाचीही आवश्यकता भासणार नाही. सध्या वाहनांची टोल वसुली ही FASTag च्या माध्यमातून केली जाते. सध्या हे सर्व काम वाहनाच्या काचेवर लावलेल्या FASTag द्वारे केले जाते. त्यामुळे FASTag मध्ये रिचार्ज करणे आवश्यक असते. वाहन टोल प्लाझातून जाताच, प्लाझावरील RFID च्या माध्यमातून FASTag मधून पैसे कट होतात. यामध्ये चालकाला काही करण्याची गरज नाही.  मात्र आता केंद्र सरकार जीपीएस सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत आहे. तर युरोपच्या धरतीवर उपग्रहावर आधारित टोल वसुली करण्याच्या पायलट प्रोजेक्टवर सरकार सध्या काम करत आहे.

कसं आहे नवं तंत्रज्ञान

युरोपच्या धरतीवर असणारी सरकारची टोल वसुली प्रणाली ही तुमचं वाहन जितकं आंतर कापेल तितकेच टोलचे पैसे कापले जाणार आहे. त्यासाठी दोन तंत्रज्ञानावर काम सुरू असून पहिल्या तंत्रज्ञानामध्ये वाहनात जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञान असणार आहे. यामुळे महामार्गावरील सॅटेलाइटद्वारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील. तर दुसरे तंत्र म्हणजे नंबर प्लेटद्वारे टोल वसुली करण्यात येणार आहे. नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असणार आहे जी सॉफ्टवेअरच्या सहाय्याने टोल वसूल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.