औरंगाबाद – अहमदनगर मार्गावर ST आणि बैलगाडीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

106

औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला असून, या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात झाला असून, या अपघातात बैलगाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ असलेल्या इंडियन हाॅटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसचा आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातात ऊस तोडीसाठी निघालेल्या बैलगाडीत बसलेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बैलगाडी चालवत असलेले मृत महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

( हेही वाचा: निर्णय घेण्यास भाग पाडू नका, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.