मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कार आणि लग्झरी बसची धडक होऊन अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने बसला धडक दिली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणा-या या मार्गावर हा अपघात झाला आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहून मुंबईकडे जाणा-या रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारची लग्झरी बसला धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

( हेही वाचा: देशभरातील रस्त्यांवरून गायब होणार ९ लाख सरकारी वाहने! काय आहे कारण? )

मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला

अपघात कासा पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here