नंदूरबारमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू, 17 गंभीर जखमी

130

नंदुरबारमधील शहादा शहरात भीषण अपघात झाला आहे. यात शहादा बायपास रस्त्यावर खासगी बस आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. शहादा तालुक्यातील रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर सुरु आहे. याच स्थलांतरादरम्यान झालेल्या अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.

( हेही वाचा: तुमचा EMI महागणार, RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ )

भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी खासगी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. शहादा शहराबाहेरुन जाणा-या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला. ही धडक इतकी भयानक होती की अपघात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर पाच वर्षीय चिमुकली शहादा येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.