सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे. खासगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस व शिर्डीकडून सिन्नरकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरु होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.
( हेही वाचा: माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन )
जखमींवर सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु
उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचाराकरता सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
Join Our WhatsApp Community