यवतमाळमध्ये भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

102

यवतमाळमध्ये रविवारी एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकी घटना काय?

कार अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळ जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली. या घटनेत राजेश इंगोले, रजनी इंगोले, वैष्णवी गावंडे आणि सारिखा चौधरी, या चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चौघे जागीच ठार झाले. बसमधील 13 जण गंभीर जखमी झाली. नेर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

( हेही वाचा: शेकडो मृत्यूनंतर इराण सरकार झुकण्यास तयार! अखेर इराणमध्ये बदलणार हिजाब कायदा? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.