महाबळेश्वर मूगदेव घाटाजवळ भीषण अपघात; 40 मजूरांचा टेम्पो दरीत कोसळला

महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील मूगदेव (Mugde) गावानजीक घाटात तीव्र उतारावर मजुरांना घेऊन जाणा-या टेम्पोला अपघात झाला आहे. या  टेम्पोतून 40 मजूर प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री ट्रेकर्सचे (Sahyadri Treckers) जवान बचाव कार्यासाठी मदत करत आहेत. आतापर्यंत 15 मजूरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

( हेही वाचा: वाशी पुलावरील वाहतूक बंद; मुंबईला जाणा-या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी )

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

महाबळेश्वरहून तापोळा मार्गावर हा अपघात झाला आहे. शनिवारी (आज) सकाळी 8 वाजता हा अपघात मुगदेव घाटात झाला आहे. मजूरांना टेम्पोमधून नेण्यात येत होते. घाटातून मजूरांना घेऊन जाताना तीव्र उतारावरून हा टेम्पो कोट्रोशी पुलाजवळ पलटी झाला. प्राथमिक माहितीनुसार, काही मजूर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोन गंभीर जखमी झालेल्या लहान मुलांना सातारा येथे पाठवण्यात येणार आहे. अद्याप जखमी मजूरांची संख्या समोर आलेली नाही. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थ मदत कार्यात सक्रीय आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here