मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रायगड जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे. तसेच, अपघातामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.

कोकणात मुंबई गोवा महामार्गावरती झालेल्या रायगड जिल्ह्यातील रेपोली येथील अपघातात कोकणातील गुहागर तालुक्यातील हेदवी येथील काहींचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. भव्य निलेश पंडित हा पाच वर्षांचा मुलगा दैव बलवत्तर म्हणून वाचला आहे. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते. मात्र, सोबत असलेल्या आधार कार्ड व काही कागदपत्रांवरुन संपर्क साधला जात आहे. या वाचलेल्या छोट्या मुलाची ओळखही आधर कार्डवरुन पटवण्यात आली.

( हेही वाचा: रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या पाचही कामांच्या प्रस्तावांना प्रशासकांची मंजुरी, कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरु )

‘असा’ झाला अपघात

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, रायगडमधील माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि भीषण अपघात झाला. इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणा-या नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here