मुंबई -नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, दोघांचा मृत्यू

मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डन हाॅलजवळ मुंबईकडून जाणा-या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षामधील आणखी तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: भीषण: वांद्रे- जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे11 डब्बे रुळावरून घसरले )

याआधीही असाच अपघात

मुंबई- नाशिक महामार्गावर गंगा देवस्थान जवळील ब्रीजवर 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. थरारक अपघातात 2 जण जखमी झाले होते. आधी भरधाव कंटेनर पलटी झाली, त्याला मागून येणा-या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला होता. नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने एक कंटेनर जात होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटून कंटेनर साधारण 200 फूट अंतरावरुन घसरत आला आणि कंटेनेरचे पुढील दोन्ही चाक तुटून ब्रीजच्या मधोमध असलेल्या गॅपमधून खाली पडले होते. गंगा देवस्थान इथे रोज दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी ब्रीज खाली कोणीही नव्हते, म्हणून मोठा अनर्थ टळला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here