मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे येणा-या मार्गावर झाला आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणा-या एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तत्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात एर्टिगा कारचा चक्काचूर झाला. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील मुंबईकडे येणा-या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणा-या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

( हेही वाचा: आफताबची आणखी एक क्रूर कृती, ४ हिंदू मुलींसोबत होते संबंध? )

मृत झालेल्या व्यक्तींची नावे

  • अब्दुल रहमान खान, 32 वर्षे घाटकोपर
  • अनिल सुनिल सानप
  • वसीम साजिद काझी, राजापूर, रत्नागिरी
  • राहुल कुमार पांडे, वय 30 वर्षे, कामोठे ,नवी मुंबई
  • आशुतोष नवनाथ गांडेकर, 23 वर्षे अंधेरी, मुंबई

गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे

  • मच्छिंद्र आंबोरे वय 38 वर्षे
  • अमीरउल्ला चौधरी
  • दिपक खैराल

किरकोळ जखमी

  • अस्फीया रईस चौधरी, 25 वर्षे, कुर्ला, मुंबई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here