बायडेन यांच्या घरावर FBI चे छापे; तीन तास चालली सर्च मोहिम

अमेरिकेची तपास संस्था एफबीआय चक्क राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निवासस्थानी छापेमारीसाठी पोहोचली. रेहोबोथ येथील समुद्रकिनारी असणा-या बायडेन यांच्या वडिलोपार्जित घर व इतर 2 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. अमेरिकेतील सर्वात प्रबळ नेत्याच्या घरात तब्बल तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. गोपनीय दस्ताऐवज घरी ठेवल्याच्या आरोपामुळे ही कारवाई झाली.

FBI ने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या खासगी निवासस्थानावर छापा टाकला. एफबीआयचा हा छापा गोपनीय कागदपत्रांसंदर्भात संबंधित होता. मात्र, या छाप्यात कोणतीही गोपनीय कागदपत्रे सापडलेली नाहीत. बायडेन यांच्या वकिलांनी एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर संस्थांच्या अधिका-यांना पूर्ण सहकार्य केले. त्यांच्यावर वैयक्तिक कार्यालयात आणि घरात गोपनीय कागदपत्रे ठेवल्याचा आरोप होता. ही कागदपत्रे 2009 ते 2016 या काळात उपराष्ट्रपती असतानाची असल्याचे सांगण्यात आले. पेनसिलव्हेनिया विद्यापीठात मानद प्राध्यापक असताना 2017-2019 पासून बायडेन यांनी हे वापरले होते, असा आरोप आहे.

( हेही वाचा: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप )

यापुर्वीही झाली आहे झडती

गेल्या महिन्यातही बायडेन यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. त्यावेळी 13 तासांच्या शोधानंतर सहा गोपनीय दस्ताऐवज जप्त केले होते. बराक ओबामा यांच्या कार्याकाळात बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असतानाची ही कागदपत्रे आहेत. सरकारी कार्यालय सोडल्यानंतर अशा कागदपत्रांना अभिलेखागाराकडे जमा करावे लागते, असा अमेरिकेतील नियम आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here