सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन या अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती तेलामध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असते. या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीनिमित्ताने राबवलेल्या मोहिमेत आतापर्यंत २ लाख २० हजार ६६० रुपयांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला. १ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी मिठाई इतर तत्सम गोड पदार्थ विक्रेते, दुकानदार, फरसाण विक्रेते यांच्या दुकानात धाडी टाकून ही कारवाई केली.
अन्न पदार्थ – नमुन्यांची संख्या
मिठाई – ५१
नमकीन – ६
खाद्यतेल – ७
तूप, वनस्पती – १०
इतर – २२
संशयित अन्नपदार्थांचे एकूण ९६ नमुने जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने शिंदे गटात नव्हे तर भाजपात केला प्रवेश)
चॉकलेट्स आणि चहापावडरही जप्त
भेसळीच्या संशयावरुन अन्न व औषध प्रशासनाने चॉकलेट्स आणि चहा पावडरीच्या १ हजार २५६ किलोचा माल जप्त केला आहे. या मालाची किंमत २ लाख २० हजार ६६० एवढी आहे.
एफडीचे आवाहन
भेसळयुक्त खवा, तूप आदींचा वापर करुन मिठाई बनवले जात असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबईतील (अन्न) अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community