FDA ची कारवाई! सणासुदीच्या काळात 2 लाख 20 हजारांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकीन या अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती तेलामध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असते. या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीनिमित्ताने राबवलेल्या मोहिमेत आतापर्यंत २ लाख २० हजार ६६० रुपयांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला. १ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी मिठाई इतर तत्सम गोड पदार्थ विक्रेते, दुकानदार, फरसाण विक्रेते यांच्या दुकानात धाडी टाकून ही कारवाई केली.

अन्न पदार्थ – नमुन्यांची संख्या

मिठाई – ५१
नमकीन – ६
खाद्यतेल – ७
तूप, वनस्पती – १०
इतर – २२

संशयित अन्नपदार्थांचे एकूण ९६ नमुने जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने शिंदे गटात नव्हे तर भाजपात केला प्रवेश)

चॉकलेट्स आणि चहापावडरही जप्त

भेसळीच्या संशयावरुन अन्न व औषध प्रशासनाने चॉकलेट्स आणि चहा पावडरीच्या १ हजार २५६ किलोचा माल जप्त केला आहे. या मालाची किंमत २ लाख २० हजार ६६० एवढी आहे.

एफडीचे आवाहन

भेसळयुक्त खवा, तूप आदींचा वापर करुन मिठाई बनवले जात असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबईतील (अन्न) अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here