भेसळयुक्त तेल कसे तयार होते? अन्न व औषध विभागाने केला पर्दाफाश

104

जेवणासाठी वापरल्या जाणा-या खाद्यतेलात भेसळ होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सध्या मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून तेलाचा साठा जप्त करण्यास सुरुवात केली आहे. अखेर २५ खाद्यतेलांच्या नमुन्यांची पाहणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने भेसळ कशी होते, याबाबतच माहिती जारी केली. यासह खाद्यतेलाच्या कंपन्यांचीही नावे जाहीर करत त्यांच्याकडून होणा-या भेसळयुक्त खाद्यतेलाच्या खरेदीपासून सावधान राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी केले.

कंपन्यांचे नाव – भेसळीचे नमुने – भेसळीचे स्वरुप

  • अनुकूल अग्रो, दहिसर – कच्ची घाणी मोहरी तेल – राईस ब्रान तेलाची भेसळ
  • जय बजरंग ओईल डेपो,घाटकोपर – सुहाना ब्राण्डचे आरबीडी पामोलीन तेल – लॅबलवर दावा केलेल्या वजनापेक्षाही प्रत्यक्षात कमी वजन
  • विमलइंटर प्रायसेस, गोवंडी – विमल ब्राण्डचे आरबीडी पामोलीन तेल – लॅबलवर दावा केलेल्या वजनापेक्षाही प्रत्यक्षात कमी वजन
  • ऋषभ शुद्ध घी भांडार, चीन्याबंदर – पोरस तूप – पामोलीन तेलाची भेसळ
  • पोरस गायीचे तूप – पामोलीन तेलाची भेसळ
  • गायीचे तूप – पामोलीन तेलाची भेसळ

अशी होते भेसळ

  • १६५ ते १७५ रुपये लीटर या दराने बाजारात उपलब्ध मोहरी तेलात १२० रुपये प्रती लीटर राईस ब्रान तेलाची भेसळ होते.
  • ७००-८०० रुपये प्रती किलो दराने विक्री होणा-या तूपामध्ये ९० ते ९५ रुपये प्रती लीटर दर पामोलीन तेलाची भेसळ होते.
  • १ लीटर पामोलीन तेलाच्या पाऊचमध्ये १५ ते २० ग्रॅम तेल भरुन ग्राहकांची फसवणूक केली जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.