आक्षेपार्ह मजकूर असलेली आयुर्वेदिक औषधे विक्रीस ठेवल्याने अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी आणि दहिसरमधील रिलायन्स रिटेल या औषध विक्री दुकानातून सहा हजार सहाशे रुपयांचा आयुर्वेदिक औषध साठा जप्त केला. ही औषधे आजारांबाबत दिशाभूल देणा-या माहितींसह विकली जात होती, असा ठपका अन्न व औषध प्रशासनाने लावला.
या दोन्ही रिलायन्स औषध विक्री दुकानांबाबत अन्न व औषध विभागाच्या गुप्त विभागाला तक्रार मिळाली होती. तक्रारीच्या आधारावर भिवंडी येथील रिलायन्स रिटेल औषध विक्री दुकानात पहिली धाड टाकली गेली. या धाडीत २० आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनाचा माल जप्त करण्यात आला. भिवंडीतील धाडीच्यावेळी रिलायन्स रिटेलच्या दहिसर शाखेतही आक्षेपार्ह मजकूर असलेली आयुर्वेदिक औषधे विकत जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे दहिसर येथील रिलायन्स रिटेल दुकानात धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने १४ आयुर्वेदिक उत्पादने जप्त केली.
(हेही वाचा – दिलासा! येत्या दोन दिवसात चित्रपटगृह, हॉटेल्स पूर्ण क्षमतेने होणार सुरू?)
भिवंडीतील रिलायन्स रिटेल औषधविक्री दुकानातील जप्त केलेल्या औषधांची यादी
बैद्यनाथ सुंदरी सखी सिरप, कापीवा करेला जामून जूस, कापीवा विगोर मॅक्स ज्यूस, लामा श्वास कुठार ज्यस, प्रविक मेमोडीन टॅबलेट, रीफवे नाईट विनर कॅप्सूल, रीफवे पावर सोर्स कॅप्सूल, रीफवे पावर ऑफ बिग कॅप्सूल, रीफवे पावर ऑफ डिक कॅप्सूल, रीफवे प्रो विगोर कॅप्सूल, रीफवे पुअर शिलजित कॅप्सूल, रिफवे रिअल मूड कॅप्सूल, रीफवे एसएक्स फुअल कॅप्सूल, रीफवे एसएक्स प्लेयर कॅप्सूल, रिफवे सफेद मसुली कॅप्सूल, रिफवे मुसली पावडर कॅप्सूल, रिफवे सेक्स बुस्टर कॅप्सूल, रिफवे सेक्स बुस्टर पावडर, बैद्यनाथ बसंत कुसुमाकर रस टॅबलेट
दहिसर येथील रिलायन्स रिटेल औषधविक्री दुकानातील जप्त केलेल्या औषधांची यादी
मेडिलेक्सिक अस्थालेक्स ड्रॉप, डॉ जॉन्स रुमाटोन प्लस सायरप, मेडिलेक्सिक कार्डिओलेक्स ड्रॉप, पॉवेल रुमोप्लेक्स सायरप, लॉर्डस बिपी फोर्ट ड्रॉप, जॉन्स डायनिस टॉनिक, जॉन्स बोझेम प्लस टॉनिक, पॉवेल डायबेटीन सिरप, लॉर्डस हाइट अप टॅलबेट, पॉवेल फेमोलेक्स टॉनिक, लॉर्डस कँल्कुली सिरप, लॉर्डस लुको आर सायरप, पॉवेल इंसोम्बिना सायरप, पॉवेल कार्डीओप्लेक्स हार्ट टॉनिक
औषधांवरील आक्षेपार्ह मजकूर
लैंगिक शक्तीवर्धक, महिलांच्या मासिक पाळी संबंधी आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, सुडील बांधा-शरीरयष्टी, श्वशन विकार-अस्थमा, अनिदा या आजांरावर उपयुक्त अशी ही औषधे असल्याचा दावा औषधांवरील मजकूरावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना सापडला. हा मजकूर औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४, कलम ३ व ४ च्या तरतूदींचे उल्लंघन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दिली गेली. या प्रकरणी रिलायन्स रिटेलवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.