पुण्यात भेसळयुक्त तूपाचा साठा जप्त, एफडीएची कारवाई

107

अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील आंबेगाव येथील गोदामावर तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत तब्बल ३३ हजार ९६ रुपयांचा भेसळयुक्त तूपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल १०६ किलोचे भेसळयुक्त तूप अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी जप्त केले.

भेसळयुक्त तूपाचा साठा जप्त, एफडीएची कारवाई

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून आंबेगावातील विकी कुंभार इमारतीतील गोदामात भेसळयुक्त तूप बनवले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या नावे असलेल्या गोदामावर ९ ऑगस्टला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी धाड टाकली. गोदामात भेसळयुक्त पदार्थ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना सापडले.

वनस्पती भेसळयुक्त तूपाचा ७३ किलो वजनाचा ११ हजार ९६ रुपयांचा साठा तर इतर भेसळयुक्त पदार्थांपासून बनवलेल्या ८८ किलोंच्या २२ हजार रुपये किंमतीचा भेसळयुक्त तूपाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी जप्त केला. जप्त केलेल्या मालातील काही नमुने पुण्यातील आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी १० हजारांचा दंड अन्न व औषध प्रशासनाने आकारला आहे. प्रयोगशाळेतून चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून दिली गेली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.