नाल्याच्या कठड्यावर गोणीत ठेवलेला ८ लाखांचा गुटखा आणि पानमसाला

गुटखा विक्रीसाठी बंदी असताना मुंबईतील ओशिवरा भागांत छुप्यारितीने सुरु असलेली गुटखाविक्री अन्न व औषध प्रशासनाने हाणून पाडली. गुटखा आणि पानमसाला सहजरित्या कोणाला आढळू नये म्हणून चक्क नाल्याशेजारील कठड्यावरील गोणीत गुटखा आणि पानमसाला कोंबून भरला होता. हा मालाची तब्बल ८ लाख २३ हजार ३० रुपये किंमत असून आता साठा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात आहे.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी गेल्या बुधवारी ५ जानेवारी रोजी ही कारवाई केली. जोगेश्वरीतील ओशिवरा सुपारी स्टोअर्समध्ये छुप्यारितीने गुटखा आणि पानमसाला मिळत असल्यची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ५ जानेवारीला ओशिवरा सुपारी स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी छापा मारला. दुकानाच्या संकुलाबाहेरही अधिका-यांनी झ़डती घेतली. त्यावेळी संकुलाबाहेरील मोकळ्या जागेत नादुरुस्त असलेल्या ओमनी गाडीत, पडक्या इमारतीत तसेच नाल्याजवळील कठड्यावर गोणीत भरून गुटखा आणि पानमसाल्याचा साठा भरुन ठेवला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांच्या पाहणीत आढळले. ८ लाख २३ हजार ३० रुपयांच्या गुटखा व पानमसाल्याची विक्री करणे कायद्याने बंदी असल्याने आरोपी आमीर शेख, अब्दुल शेख यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

जप्त केलेला गुटखा आणि पानमसाला 

एचएसके गुटखा, सफर गुटखा, ४के गुटखा, गोवा १००० गुटखा, विमल पान मसाला आणि रजनीगंधा पान मसाला

या पथकाने केली कारवाई

अन्न सुरक्षा अधिकारी रा. दि. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी म.रा.घोसलवाड, मी.रा.महांगडे, ज्ञा.सु.महाले. यांच्यासह सहा परिमंडळाच्या अन्न विभागाच्या साहाय्य आयुक्त अ. रांजणे, शशिकांत केकरे, गुप्तवार्ताचे सह आयुक्त समाधान पवार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here