बाजारात मिळतेय भेसळयुक्त तेल; एफडीएच्या तपासणीत २७ नमुन्यांत आढळल्या त्रुटी

118

बाजारात मिळणा-या भेसळयुक्त तेलाच्या प्रक्रियेबाबत शंका असल्याने अन्न व औषध विभागाने (एफडीए)गेल्या काही दिवसांत विविध गोदामांत धडकसत्र राबवले होते. ठाणे, नवी मुंबई येथील गोदामातून बाजारात विकल्या जाणा-या सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मोहरी आणि शेंगदाणा तेलासह क्रीम आणि तूपातही भेसळ केल्याचे प्रयोगशाळा अहवालात सिद्ध झाले आहे. तब्बल २७ नमुने भेसळयुक्त असून, अन्नपदार्थ विकणा-या व्यावसायिकांना खाद्यतेल पुरवणारे दुकानदार आता एफडीच्या रडारवर आले आहेत. गोदामातून दुकानात तेल विक्रीसाठी आणले जातात. आता दुकानांवर धडकसत्र सुरु होईल, अशी माहिती एफडीएच्या अधिका-यांनी दिली.

( हेही वाचा : सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा)

आरोग्यासाठी हितकारक असल्याचा दावा करणे तसेच मूळ तेलाच्या उत्पादनात भलतेच तेल मिसळलेले असल्याचे एफडीएच्या प्रयोगशाळा अहवालातून उघडकीस आले. या अहवालाच्या आधारावर आता अधिकारी दंडात्मक तर काही कंपन्यांवर न्यायालयीन खटला उभारणार आहेत, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असेही अधिका-यांनी सांगितले.

भेसळयुक्त कंपन्या – भेसळयुक्त नमुने- भेसळीचे स्वरुप

  • जी.पी.एस. ऑईल इंडस्ट्रीज, दहिसर – रिफाईन्ड सूर्यफूल तेल (नीरकमाल)- चुकीचे आरोग्यवर्धक दावे
  • रिफाईन्ड सूर्यफूल तेल – (जेमनीन)-चुकीचे आरोग्यवर्धक दावे
  • जे.जे.ट्रेडिंग कंपनी ,भिवंडी – रिफाईन्ड सूर्यफूल तेल (सनलिली) – पामोलीन तेलाची भेसळ
  • रिफाईन्ड सोयाबीन तेल (अमन)-पामोलीन तेलाची भेसळ
  • मोहरी तेल (सुगंध) – राईस ब्रान तेलाची भेसळ
  • मोहरी तेल (पिके)- राईन ब्रान तेलाची भेसळ
  • शेगदाणा तेल (हिरेन)- आवश्यक परवाना लेबलवर नमूद नसणे
  • गॅलेक्सी एन्टरप्राईजेस, ठाणे – पीबीडी पामोलीन तेल – पाम ऑलिव्ह तेलाची भेसळ
  • रिफाऊन्ड राईसप्रान तेल – पामोलिन तेलाची भेसळ
  • रिफाईन्ड सूर्यफूल तेल (गॅलेक्सी) – पामोलीन तेलाची भेसळ
  • रिफाईन्ड सूर्यफूल तेल (गॉल्डन दिलाईत)-पामोलीन तेलाची भेसळ
  • मोहरी पाणी तेल (राधाकृष्णा) – राईस ब्रान तेलाची भेसळ
  • कच्ची घाणी मोहरी तेल (ऐरावत हत्ती) – राईन ब्रान तेलाची भेसळ
  • गणेश मिल्क प्रोडक्ट्स, कोपरखैराणे – क्रिम – व्हेजिटेबल तेलाची भेसळ – तूप – व्हेजिटेबल तेलाची भेसळ

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.