लसीकरणाबाबत झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये उदासीनता! 

देशात आणि राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे, मात्र मुंबईत झोपडपट्टीत याला अल्प प्रतिसाद आहे. 

राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे, ज्यात ज्येष्ठ नागरिक आणि अनेक आजार जडलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक वयस्क असलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र हा टप्पा सुरु झाल्यापासून झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी लसीकरणात विशेष सहभाग घेतल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे आता महापालिका लसीकरणासाठी झोपडपट्टीधारकांकडे विशेष लक्ष देणार आहे.

भीतीपोटी लसीकरणाकडे करतात पाठ!

लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मुंबईत २ लाख १३ हजार जणांना लस देण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु झाले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरीक आणि अनेक आजार जडलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरीक नाव नोंदणी करत आहेत. मात्र यात झोपड्पट्टीमधील  नागरिकांचा सहभाग कमालीचा कमी आहे. त्यामुळे महापालिकेच्या समोर मोठे आव्हान आहे. यामागे अनेक कारणे समोर येत आहेत. यात अनेकांना ही लस घेण्याची भीती वाटते, तर अनेक जण ही लस घेतल्याने त्याचे दुष्परिणाम होतात, या भीतीने लस घेत नाहीत.

(हेही वाचा : राज्यात कोरोनाचा उद्रेक; १६,६२० नवीन रुग्ण!)

सोसायट्यांमधून उत्तम प्रतिसाद!

तिसऱ्या टप्प्यात सोसायट्यांमधील नागरीक मोठ्या प्रमाणात लस घेताना दिसत आहेत. त्यांच्या नोंदी अधिक होताना दिसत आहे. कारण त्यांच्यामध्ये अधिक जागरूकता झाली आहे. त्यामुळे महापालिका आता झोपडपट्यांमध्ये जाऊन लोकांना लसीकरण केंद्रात आणणार आहे. त्यांच्या नोंदीही करणार आहे.

रोजंदारीवर काम करतात म्हणून वेळ घालवत नाही! 

झोपडपट्टीत बहुतेक जण हे रोजंदारीवर काम करणारे असतात, अशा वेळी लस घेण्यासाठी दिवसाची सुटी होईल, तेवढा पगार मिळणार नाही, म्हणूनही ते लसीकरण केंद्रात येण्याचे टाळत असल्याचे महापालिकेच्या निर्दशनात आले आहे. त्यामुळे आता महापालिका झोपडपट्टीमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here