मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरावर ड्रोन हल्ल्याची भीती तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे, हे हल्ले रासायनिक अथवा स्फोट घडवून आणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डार्क नेट या वेबसाईटवर नुकतेच याबाबतचे मनसुबे आखले जात असल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. हे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी मात्र राज्याकडे अँटी ड्रोन यंत्रणाच नसल्यामुळे हे हल्ले रोखण्यास यंत्रणा अपयशी ठरेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
महाराष्ट्राला ड्रोन हल्ल्याची भीती
पंजाब आणि जम्मू-काश्मीर या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून, पाकिस्तान भारतात मोठ्या प्रमाणात स्फोटके, अमली पदार्थ पोहोचवण्याचे काम करत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या ड्रोन हल्ल्याची भीती आता महाराष्ट्राला देखील आहे. मुंबईसह राज्यातील इतर महत्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्याचे सावट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशात बंदी आणण्यात आलेल्या डार्क नेट या वेबसाईवर या ड्रोनच्या माध्यमातून रासायनिक आणि सायबर हल्ल्याचे मनसुबे आखले जात असल्याचा अहवाल नुकताच महाराष्ट्र सायबर विभागाने दिला आहे. डार्क नेटवरून या हल्ल्याबाबतची चर्चा समोर आली असून काही दहशतवादी संघटनेकडून या हल्ल्याची आखणी करण्यात येत आहे.
( हेही वाचा : पुण्यात सुद्धा बुली बाई ॲप प्रकरण? वाचा काय आहे प्रकरण… )
ड्रोन हल्ल्याची भीती नाही
महराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले २० ते ३० किलोमीटर अंतरावरून केले जाऊ शकतात, हल्ले रासायनिक अथवा स्फोटकांनी केले जाऊ शकतात, हल्ल्यानंतर ड्रोनला बॅक ट्रक करता येत नसल्यामुळे हे हल्ले रोखण्यात यावे त्यासाठी कार्यरत पाहिजे जेणे करून हे हल्ले रोखता येतील. ३ वर्षांपूर्वी राज्य सरकारने ही यंत्रणा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, हे काम जलद गतीने व्हायला हवे, असे यादव यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community